पनवेल | पोलिस दलात असल्याचे खोटे भासवून लग्न जुळवून घेतले. त्यानतर सासूचे १२ तोळे दागिनेही खासगी सावकाराकडे गहाण ठेवून पती, सासू आणि सासरा यांनी फसवणूक केल्याची फिर्याद विवाहितेने कळंबोली पोलिस ठाण्यात केली आहे. आरोपी हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या बिचुकले तालुयातील आहेत.
पनवेल | पनवेल परिसरात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याने सिडको प्रशासनाच्या नावाने नागरिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली शहरात असुरळीत पाणी पुरवठा सुरु असला तरी नळाला मात्र कमी दाबाने येणार्या पाण्यामुळे पनवेलकरांचा घसा कोरडा पडत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून मार्केटमध्ये यावर्षी पाणी साठवून ठेवण्याच्या इमच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे इम विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
म्हसळा | म्हसळा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुक्यातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात याव, अशी मागणी तहसीलदार सचिन खाडे व पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्याकडे करण्यात आली. अवजड वाहतूक सुरू असल्याने भयंकर अपघात वाढत चालले आहेत. स्थानिक नागरिकांच्या व पर्यटकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाड | किल्ले रायगडावर वर्षभरात होणारे विविध उत्सव व कार्यक्रमासाठी होणारी अलोट गर्दी त्यासाठी असणार्या पोलीस बंदोबस्तासाठी बाहेरुन येणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ‘किल्ले रायगड’ची माहिती व्हावी, यासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाने ‘किल्ले रायगड’ची भव्य प्रतिकृती तयार करुन घेतली आहे.
अलिबाग | प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्या (परिचलन पद्धतीने) पार पडलेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदर वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार असून, वाहनचालकांना लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अलिबाग | रायगड जिल्ह्याचा पारा आता ३४ ते ३८ अंश सेल्सिअस पार जात असून, तीव्र उन्हामुळे जिल्हावासियांना बाहेर पडणे कठीण होत आहे. अशा या तीव्र उन्हात उष्माघाताचा धोका वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यातूनच जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तयार केला आहे.
महाड | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १२ एप्रिल रोजी किल्ले रायगडवर येणार आहेत. शिव पुण्यतिथी कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यांच्या या दौर्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, २८ मार्च रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी किल्ले रायगडला भेट देऊन पाहणी केली.
महाड | महाड एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील नडगांव गावाच्या हद्दीतून एका कुख्यात नक्षलवाद्याला जेरबंद करण्यात आले आहे. बिहार पोलिसाचा स्पेशल टास्क फोर्सने महाड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेला नक्षलवादी महाड एमआयडीसी परिसरात मजूर म्हणून काम करित होता.
अलिबाग | अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे येथील बाह्यवळण मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर घडक होऊन झालेल्या अपघातात बामणोली येथील दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला. मिथील रमेश सुतार असे त्याचे नाव आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
धाटाव | रोहा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील अनिल कुंभार या शिक्षकाने शाळेतील ६ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करत, शिक्षक अनिल कुंभार याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रोहा तालुका हादरला असून, पालकांमधून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई | मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरीता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन शहरापासून जवळच असलेल्या श्रीवर्धन म्हसळा मार्गावरील बोडणी घाटातील उतारावर श्रीवर्धनकडे येणार्या ट्रेलरला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर अचानक ट्रेलरने पेट घेतला. सुदैवाने चालक व क्लीनर वेळीच बाहेर पडले. मात्र ट्रेलर जळून खाक झाला आहे. या ट्रेलरमध्ये कन्ट्रक्शनसाठी लागणारे लोखंडी स्टील होते.
21.1k
मुरुड | मुरुडमधील जंजिरा किल्ल्याच्या नवीन जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही जेट्टी दिवाळीत पर्यटकांसाठी खुली होईल, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली आहे. मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. राजपुरी व खोरा बंदर या जेट्टीवरुन ते किल्ला पाहण्यासाठी बोटीने येत असतात. मात्र मार्चनंतर समुद्राच्या पाण्याला वेग येतो आणि बोटी हलायला लागतात.
मुरुड जंजिरा | उझबेगी परकीय आक्रमक बाबर वंशज औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजी नगर या शहरातून काढून टाकावी, असे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विेश हिंदू परिषद व बजरंग दल मुरुड प्रखंडा मार्फत मुरुड तहसिलदार रोहन शिंदे यांच्याकडे दि. १८ मार्च रोजी देण्यात आले आहे.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. माणगाव शहरातील तीन बत्ती नायावर कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
माणगाव | तालुयातील विळे-भागाड येथे घरफोडी चोरी करून २ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद राजकुमार भाऊराव शंभरकर (वय- ६२) रा.एमएसएल कॉलनी विळे- भागाड, माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
धाटाव | रोहा अष्टमी नगरपरिषदेजवळील रस्त्यावरुन जाताना मोटारसायकल दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात रोहा भुवनेश्वर येथील अमोल मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली अमोलची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. गुरुवारी (२० मार्च) उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर समुद्र किनारी सेल्फीच्या नादात एका महिला पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातून पर्यटनासाठी नऊ महिला श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे आल्या होत्या.
म्हसळा | म्हसळा सकलप फाटा येथे ओव्हरलोड मायनिंग वाहतूक करणार्या आयवा डंपरचा अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (२४ मार्च) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीवर्धन हरिहरेश्वर हद्दीतून रोज हजारो टन मायनींग (मिश्रीत माती) ट्रक ट्रेला, आयवा डंपरने श्रीवर्धन, म्हसळा राज्य मार्गाने आणि दिघी पुणे राष्ट्रीय मार्गाने वाहतूक करण्यात येत आहे.
पेण | पेण तालुयातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खवसावाडी येथे रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हर्षा कन्स्ट्रशन यांनी ६० लाखांचा ठेका घेऊन रस्ता पूर्ण केल्याचा दावा अधिकार्यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणीअंती या वाडीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नाही, हे उघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकार्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
पेण | होळी, धूलिवंदन, ईद, रंगपंचमी आदी सणांदरम्यान पेण तालुयातील नागरिकांनी सण उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये किंवा कायदा हातात घेऊ नये अशा प्रकारच्या सूचना पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दिल्या होत्या. अनेक नागरिकांनी आपला सण उत्सव उत्साहात पार पाडला.
सुधागड-पाली | वाढत्या शहरीकरणामुळे आणि हवामान बदलामुळे चिमण्यांसह इतर पक्ष्यांची संख्या चिंताजनक प्रमाणात घटत आहे. या पोर्शभूमीवर, कडायाच्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना आणि नागरिक पुढाकार घेत आहेत. अनेक जण भूतदया दाखवताना दिसत आहेत.
पाली | सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी गीता पालरेचा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून रायगडसह नवी मुंबईत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली धरणाचे परिसरातील २० गावातील शेतकर्यांनी आपल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते.साखळी उपोषणाच्या दुसर्या दिवशी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांच्या सर्व मागण्यांवर एका महिन्यात कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
माथेरान | पर्यटकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून नेरळ माथेरान मिनी ट्रेनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
खोपोली | खालापुर तालुयात अनेक जल जीवन पाणी योजनेचे काम मार्च महिना अखेरीस सुरू असून काही जल जीवन मिशन पाणी योजनेचे काम बंद असल्याने संबंधित ठेकेदांराच्या विरोधात ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत असून ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
खोपोली | चित्रपटामध्ये पोलीस उशिरा पोहचणे, ऐकून न घेणे, ऐकूण घेतल्यावर उलटच करणे अशी नागरिकांची धारणा आहे. याविरुद्ध रायगड पोलीस दल काम करते, अशा शब्दांत विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी रायगड पोलिसांचे कौतुक केले आहे.
उरण | उरण-नेरूळ लोकल मध्येच बंद पडल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल झाले. या लोकलमधून प्रवास करणार्या प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरुन चालत, पर्यायी वाहन पकडून घर गाठावे लागले. याआधी जानेवारी महिन्यातदेखील अशीच लोकल बंद पडली होती. लोकल बंद पडण्याच्या या प्रकारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उरण | विरार-अलिबाग कॉरीडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसताना आता, नवीन ग्रीनफिल्ड राष्ट्रीय राजमार्ग (पागोटे -राष्ट्रीय राजमार्ग ३४८ ते चौक) साठी चिरनेर व कळंबुसरे येथील शेतकर्यांच्या जागांचे सर्व्हेक्षण सुरु आहे. याबाबत कुठलीही माहिती न देता हे सर्व्हेक्षण सुरु केल्यामुळे शेतकर्यांनी त्याला विरोध केला आहे. यावेळी संबंधीत अधिकार्यांनी दमदाटी केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
पोलादपूर | महाड तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील इसाने कांबळे येथून शनिवारी, २२ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास कोणी तरी अज्ञात इसमाने दोन अल्पवयीन मुलींना फिर्यादीच्या आई वडिलांच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले असून दोन्ही अल्पवयीन मुली या सख्ख्या बहिणी असल्याची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.
पोलादपूर | रायगडात विशेषतः दक्षिण भागातून मोठ्या शहरांमध्ये कामाधंद्या निमित्ताने गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी गावाकडे आले आहेत. त्यामुळे गावं भरली असून, एक वेगळाच उत्साह सर्वकडे पहायला मिळत आहे. आज होळी असून उद्या धुळवड साजरी करण्यात येणार आहे. होळीसाठी बुधवारी (१२ मार्च) हळकुंड सजविण्यात आले आहे. तर रात्री चोर होळी उत्सव जोरदार साजरा करण्यात आला. अनेक चाकरमानी गावागवात दाखल झाल्याने वर्दळ वाढली आहे.
तळा/अलिबाग | भैय्या एक पिशवी दो...ताई एक पिशवी द्या...घरातून हात हलवत बाजारात गेल्यानंतर, पिशवीसाठी दुकानदाराकडे हात पसरण्याची घाणेरडी सवय, मुक्या जनावरांसाठी किती घातक ठरते? याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील तळा शहरात पहायला मिळाले. पुसाटी येथील एका गायीच्या पोटातून तब्बल १८ किलो प्लास्टिक काढण्यात आले.
तळा । तळा नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर वाढीच्या नोटीसा बजावल्या असुन जाचक वाढीव कर विरोधात सर्व पक्षीय नागरिक आक्रमक झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कर परवडणारे नसुन रहीवासी सामुहिक हरकती नोंदवीण्यासाठी नगरपंचायत समोरआक्रमक पवित्रा घेणार आहेत. तालुका डोंगराळ दुर्गम असून शहरात नगरपंचायतीने मुलभूत सोयी सुविधा दिल्या नाहीत. पाणी एकदिवस आड येत आहे.
उरण | उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांची बदली होऊन तीन ते चार महिने झाले तरीही उरण पंचायत समितीला अद्याप कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असून, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
नागपूर | केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरु आहेत. शेतकर्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकर्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे | पुण्यातून सुरु झालेल्या गिया बार्रेचे रुग्ण आता राज्यभरात आढळत आहेत. दुषित पाण्यामुळे या आजाराचा धोका असल्याचे सांगितले जात होते. मात्र चिकनमुळेही ‘जीबीएस’चा आजार होऊ शकतो, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे चिकन पूर्ण शिजवून सोबतच चिकन घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
"लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्रर एकनाथ शिंदे यांनी बीड येथे कृषी महोत्सवात केली आहे
मुंबई | पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदारांच्या गुंतवणुकीसंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे लवकरच बैठक घेण्यात येईल. या बैठकीस लोकप्रतिनिधी आणि ठेवीदार यांना बोलवण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
मुंबई | रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने पर्यावरण संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादा (छॠढ) समोर विषय सध्या प्रलंबित आहे. याबाबतचा अंतिम निकाल आल्यावर याबाबत कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.